
भंडारा,दि.०६ : सकल ओबीसी संघर्ष समिती, ओबीसी सेवा संघ, ओबीसी जनगणना परिषद. संविधान शाखा, संविधान संघर्ष समिती. ओबीसी क्रांती मोर्चा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने जनगणनेत ओबीसी चा कालम नाही तर ओबीसींचा जनगणनेला सहकार्य नाही, म्हणून गुरुवार दि. ५ मार्च ला सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भंडारा येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
ओबीसींची स्वतंत्र जनगणना केंद्र सरकारने जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, युजीसी विधेयक २०२६ ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी युजीसी विधेयक २०२६ त्वरित लागू करावे. क्रिमिलेअर मर्यादाः वाढत्या महागाईच्या काळात क्रिमिलेअरची जाचक मर्यादा वाढवण्यात यावी. अशाप्रकारे विविध मागण्यांचा समावेश होता. तरी जिल्ह्यातील ओबीसी व बहुजन समाजतील पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन सकल ओबीसी समाज, जिल्हा भंडारा ओबीसी संघर्ष समिती, ओबीसी सेवा संघ, ओबीसी जनगणना परिषद संविधान शाखा, संविधान संघर्ष समिती, ओबीसी क्रांती मोर्चा भंडारा यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.
निवेदन देतेवेळी सदानंद ईलमे, डॉ. बाळकृष्ण सार्वे, रोशन उरकुडे, भगिरथ थोटे, उमेश कोराम, गोपाल सेलोकर, रमेश शहारे, संजय मते, मंगला वाडीभस्मे, ललिता देशमुख, वृंदा गायधने, लता बोरकर, प्रभाकर वैरागडे व इतर ओबीसी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.





