
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा लढा अंतिम टप्प्यात
गोंदिया 0-जिल्ह्यातील शिक्षकांना एकस्तर पदोन्नती अंतर्गत उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदाची वेतनश्रेणी सोबतच इतर पदांना वरिष्ठ पदाच्या पदोन्नतीची वेतनश्रेणी मिळण्यासंदर्भात शिक्षक समितीने सर्व शासन परिपत्रकांचा संदर्भ देऊन सर्व विभाग प्रमुखांना अभ्यासपूर्ण पद्धतीने शासन निर्णय समजावून सांगण्यात यश आले असून लवकरच सर्व शिक्षकांना सुधारित पद्धतीने एकस्तर पदोन्नती लागू करण्याचे ठोस आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगानंथम यांनी शिक्षक समिती शिष्टमंडळाला दिले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जिल्ह्यातील शिक्षकांना सुधारित एकस्तर पदोन्नती नुसार वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात मागील पाच महिन्यापासून अविरत लढा दिला असून शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षक पदाचे पदोन्नतीचे पद ‘ उच्चश्रेणी मुख्याध्यापक’ असल्याने त्यांना एकस्तर पदोन्नती अंतर्गत एस – 13 ऐवजी S – 14 चा लाभ वेतनवाढीचा लाभ सोबतच पदवीधर शिक्षक व उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांना समोरील पदाच्या पदोन्नतीच्या लाभ देण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया अनुकूल असून लवकरच आदेश निर्गमित करून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना न्याय देणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगानंथम यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला शिष्टमंडळ भेटीत सांगितले शिक्षक समितीने उचललेल्या मुद्द्याला लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद अध्यक्ष,सुरेश हर्षे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य लेखा वित्त अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया ,उपमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद गोंदिया, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी विशेष सहकार्य केले आहे.
शिष्टमंडळ सभेत जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, उपाध्यक्ष एच. एस. बिसेन,कार्याध्यक्ष मुकेश रहांगडाले, गौतम बांते,राज कडव,उमेश रहांगडाले, देवेंद्र बरया, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सौ. ममता येडे, सौ भारती तिडके,कु. मीनाक्षी पंधरे,सौ मीनाक्षी रहांगडाले, कुमारी वंदना झोडे, सौ. हेमलता मोरघडे यासह समिती पदाधिकारी उपस्थित होते.
” सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य शासन निर्णय 29 फरवरी 2024 मधील तरतुदीनुसार गोंदिया जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सुरू केलेला एकस्तर पदोन्नती अंतर्गत तफावत दूर करण्यासंदर्भातील लढा अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांच्या एकस्तर पदोन्नती अंतर्गत वेतनातील तफावत दूर करून फरकाची राशी मिळवून देण्यासाठी शिक्षक समिती कटिबद्ध आहे.”संदीप तिडके, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया





