33.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home राजकीय हा राज्य शासनाचा बजेट नसून अदानीच्या कार्यालयातून सादर केलेला बजेट-अमर वराडे

हा राज्य शासनाचा बजेट नसून अदानीच्या कार्यालयातून सादर केलेला बजेट-अमर वराडे

0
47

blank

हा राज्य शासनाचा बजेट नसून अदानीच्या कार्यालयातून सादर केलेला बजेट आहे. या बजेटमध्ये महाराष्ट्रातील सामान्य माणसांकरिता कुठलीही दिलासा जनक बातमी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीची फसवी घोषणा जाहीर केली, यामध्ये महाराष्ट्रातील नेमके किती आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार याचा उल्लेख नाही. शेतकरी कर्जमाफीच्या निकषाबद्दल कुठलाही उल्लेख नाही. पुढच्या काळात महाराष्ट्रात उद्योगपतींचे राज्य येईल आणि सामान्य माणसांच्या हातात भिकेचा कटोरा येईल अशा प्रकारचा आजचा हा बजेट आहे….. अमर वराडे