
अशोक खरातला आयोगाच्या अध्यक्षांचेच अभय?
रुपाली ठोंबरांचा खळबळजनक आरोप
मुंबई:-नाशिकमधील कथित ज्योतिषी आणि स्वंयघोषित कॅप्टन अशोकला अटक केल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली आहे. त्याच्यावर महिलेने बलात्काराचा आरोप केला असून यातर्गंत त्याला अटक करण्यात आली.त्यानंतर महाराष्ट्रातील एपस्टिन असल्याचा धक्कादायक आणि किळसवाणी कृत्य त्याचे बाहेर येत आहे. अशोक खरात हा राजकीय वर्तुळात वावर असल्याने त्याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात भूकंप आला आहे. कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. ज्यात त्या अशोक खरात यांचे पाय धुताना दिसत आहे. तर एका फोटोमध्ये अशोक खरात यांच्यासाठी छत्री घेऊन उभा आहेत. सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
बलात्कार प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका स्वयंघोषित कॅप्टन आणि ज्योतिषाला अटक केली आहे. अशोक खरात असं या ज्योतिषाचे नाव आहे. नाशिक पोलिसाच्या क्राइम ब्रांच-१ युनिटने बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे नाशिकसह राज्यात खळबळ उडाली आहे. एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात या अशोक खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अटकेमुळे नाशिकमधील भोंदूगिरी आणि शोषणाचे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





