24.6 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home विदर्भ वाशिम येथे द ग्रेट अशोक संघटनेच्यावतीने घर घर संविधान कार्यक्रमाचे आयोजन

वाशिम येथे द ग्रेट अशोक संघटनेच्यावतीने घर घर संविधान कार्यक्रमाचे आयोजन

0
30

वाशिम,दि.२४-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतीय संविधानाचा ७५ व्या वर्ष महोत्सवानिमित्ताने घर घर संविधान मेळावा न्याय स्वतंत्रता समानता बंधुता समतेचा वैचारिक आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन नालंदानगर येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष वाशिमचे नगराध्यक्ष अनिल भाऊ केंदळे हे होते,तर उदघाटक म्हणून डाॅ.सिध्दार्थ देवळे उपस्थित होते. कार्यक्रमाला विशेष निमंत्रित पाहुणे म्हणुन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पियुष चव्हाण,मुख्य मार्गदर्शक अमन कांबळे,प्रा.डॉ.अतुल कुमार राऊत उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात
भीम गीत सांस्कृतिक प्रस्तुतीने करण्यात आली.”दुनिया मे भीमजी महान “विनया, विजया,वैभव जाधव आणि संच नागपूर यांचा भीम गीतांचा धडाकेबाज कार्यक्रम सादर करण्यात आला.यावेळी मालेगावचे नगराध्यक्ष ओमप्रकाश भाऊ खरसडे, नगरसेवक सनी घुगे,अनिल ताजणे,दौलतराव हिवराळे,अनंतराव भाऊजी जुमडे,स्वप्निल भाऊ जाधव,विजय मनोहर,संतोष भाऊ ठोके,राजेंद्र खिडसे, भीमराव इंगोले ,आतिश ढाले,ज्ञानेश्वर भाऊ गवळी,विजुभाऊ कांबळे ,ज्योतीताई इंगळे ,दत्ताभाऊ भगत, संतोष इंगळे, दिनकर पखाले, गोकर्ण बाई पखाले ,विमल पखाले, आरती पखाले ,शिल्पा पखाले, आनंदराव सरकटे, नितीन पखाले, मनीष इंगळे ,राजदीप पखाले, अनिल पखाले, विजय पांडुरंग पखाले ,अंतोदय चोथमल, स्वप्निल खडसे, रत्नमाला पखाले ,सिंधुबाई सरकटे ,प्राध्यापक वानखेडे,शाम खिल्लारे ,गजानन गुडदे ,रमेश गवई, दिलीप गवई, रंगपाल सावळे ,अरुणा ताजने, दिपाली गवई, दिपाली पडघान ,दीक्षा कांबळे, सुनिता साबळे, आम्रपाली खिल्लारे, कवित्री बनसोड ताई आदीची कार्यक्रमाला उपस्थिती होती.सूत्रसंचालन हेमंत तायडे यांनी तर आभार प्रदर्शन अमोल पखाले यांनी केले.या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक द ग्रेट अशोक संघटना व बहुउद्देशीय संस्था रजिस्टर नंबर महा ५५०/2014 वाशिमचे आकाश पडघान,अमोल पखाले,अतुल पखाले,आरतीताई संतोष ठोके,निखिल वैद्य यांनी यशस्वी आयोजन केले.