31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ कोहळी समाज विकास मंडळाच्या सभेत समाजभवनासह विविध विकास कामांचा निर्धार

कोहळी समाज विकास मंडळाच्या सभेत समाजभवनासह विविध विकास कामांचा निर्धार

0
30

blank

गोंदिया-कोहळी समाज विकास मंडळाच्या सहविचार सभेत समाजभवनासह विविध विकास कामांचा निर्धार ​कोहळी समाज विकास मंडळ नागपूर शाखा गोंदियाच्या वतीने नुकतीच ग्रीन पार्क नवेगाव बांध येथे सहविचार सभा उत्साहात पार पडली. केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रकाशभाऊ बाळबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत समाजाचे संघटन, प्रलंबित प्रश्न आणि नागपूर येथील समाजभवन बांधकाम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ​सभेला केंद्रीय उपाध्यक्ष अमोल मुंगमोडे, मार्गदर्शक गंगाधर परशुरामकर, जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, प्रकाश गहाणे केंद्रीय सदस्य, उपाध्यक्ष राधेश्याम कापगते, जिल्हा सचिव होमराज पुस्तोडे, जिल्हा परिषद सदस्या जयश्री देशमुख, कविता कापगते सुरेश परशुरामकर आणि रामदास बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ​गाव तिथे शाखा आणि तालुका कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी सभेचा हेतू स्पष्ट केला. अमोल मुंगमोडे यांनी प्रास्ताविकातून गेल्या तीन वर्षांतील कार्याचा आढावा घेतला. समाजाची प्रगती साधण्यासाठी ‘गाव तिथे शाखा’ हे अभियान राबवून गावपातळीवर कार्यकारिणी गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या १५ दिवसांत गावागावांत बैठका घेऊन समाजातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात या शाखा उभारल्या जातील, ज्यामुळे समाजबांधवांचे संघटन अधिक मजबूत होईल. गाव शाखांच्या निर्मितीनंतर तालुका कार्यकारिणीचे गठन करण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले. ​नागपूर समाजभवन बांधकामातील तांत्रिक अडचणी दूर होणार अध्यक्ष प्रकाशभाऊ बाळबुद्धे यांनी नागपूर येथील समाजभवन बांधकामाबाबत सविस्तर माहिती दिली. या कामासाठी शासनाकडून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. मात्र, जुन्या इमारतीच्या तपासणीत (इमारत मजबुतीकरण चाचणी) अहवालानुसार वरचे बांधकाम करण्यासाठी इमारत अपात्र ठरवण्यात आली होती. आता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार इमारतीचे मजबुतीकरण करण्यासाठी ६० ते ६५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असून येत्या १५ दिवसांत हा प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ​निधी संकलन आणि सभासद नोंदणी शासकीय निधी केवळ बांधकामासाठी असल्याने, समाजभवनातील अंतर्गत सजावट, फर्निचर आणि वसतिगृह चालवण्यासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी समाजबांधवांच्या लोकवर्गणीतून उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, मंडळाची सभासद नोंदणी मोहीमही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ​न्यायालयीन प्रकरणांबाबत नाराजी ज्येष्ठ मार्गदर्शक गंगाधरजी परशुरामकर यांनी धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. समाजाच्या कामात अडथळा निर्माण करून प्रकरणे न्यायप्रविष्ठ करणे क्लेशदायक असून, तक्रारदारांनी ज्येष्ठ बांधवांच्या समक्ष बसून तोडगा काढावा व ही प्रकरणे मागे घ्यावीत, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.या सभेला राधेश्याम कापगते , परशुरामकर नवेगावबांध कोहळी समाज मंडळाचे सचिव घनश्याम कापगते खुशाल डोंगरवार जयंत लांजेवार मधुकर कापगते जितेंद्र कापगते खुशाल काशीवार डॉक्टर युवराज कापगते एकनाथ बोरकर महादेव बोरकर पंकज परशुरामकर पंकज कापगते परसटोला रेशीम झोडे राजोली ​या सभेत प्रकाश गहाने, दिलीप लोदी, रेशीम झोळे, खुशाल डोंगरवार होमराज पुस्तोडे सौ कविता कापगते ताणबा देशमुख योगेंद्र कापगते अरविंद कापगते अनिल ऊसतोडे योगेश पुस्थळे डॉक्टर गुलाब डोंगरवार खुशाल काशिवार होमराज गहाणे नीलकंठ बोरकर भास्कर बाळबुद्धे विजय संग्रामणे प्रदीप पुस्तके विलास गोबाडे अनिल देशमुख अशोक हांडेकर यांच्यासह सभेला तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लवकरच समाजाचे भव्य अधिवेशन घेण्याचेही या सभेत ठरवण्यात आले.

गाव तिथे समाज शाखा स्थापन करणार-किशोर डोंगरवार

कोहळी समाजाची सामाजिक बांधिलकी जपणारा समाज म्हणून ओळख आहे .समाजाचे संघटन वास्तव्य असणाऱ्या प्रत्येक गावात निर्माण करण्यासाठी गाव तिथे शाखा तयार करण्यासाठी लवकरच जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये गाव संवाद दौरा आयोजित करून गाव तिथे शाखा व प्रत्येक तालुक्यात कार्यकारिणी तयार करण्याचे कामाला प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती किशोर डोंगरवार जिल्हाध्यक्ष कोहळी समाज विकास मंडळ जिल्हा गोंदिया यांनी दिली

blank