अमरावती -शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गुरुवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. आयुक्तालयात कार्यरत असलेल्या शीघ्र कृती दलाच्या (QRT) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन जीवनयात्रा संपवली. विजय नागापुरे असे मृत जवानाचे नाव असून, या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९:३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस आयुक्तालय परिसरातील क्युआरटी कार्यालयातच विजय नागापुरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. गोळीबाराचा आवाज होताच परिसरातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.





