31.8 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home शैक्षणिक प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचे ६ एप्रिलपासून साखळी उपोषण

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचे ६ एप्रिलपासून साखळी उपोषण

0
52

गोंदिया, दि.30 : : प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही ठोस निर्णय न घेतल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आता आक्रमक झाली आहे. जिल्हा परिषद गोंदियाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संघटनेने येत्या ६ एप्रिलपासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
प्राथमिक शिक्षकांचे प्रशासकीय प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असून, वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर मार्ग निघत नसल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. संघटनेच्या निवेदनानुसार, प्रशासकीय उदासीनतेमुळे शिक्षकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. ‘प्रशासनाने वेळीच मागण्या मान्य न केल्यास ६ एप्रिलपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात येईल. यात जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होतील,’ असे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारीमार्फत राज्य शासनाला देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष संदीप तिडके यांच्यासह विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, जिल्हा
उपाध्यक्ष एच. एस. बिसेन, राज्य कार्यकारिणी सदस्य शरद पटले, जिल्हा कार्याध्यक्ष मुकेश रहांगडाले, अनिलवट्टी, राजेंद्र बोपचे, सतीश दमाहे, राहुल गणवीर, सेवकराम रहांगडाले, मधुकर ठाकरे, सुनील बैठवार व साखरे सर यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

blank