28.3 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन

0
257

गोंदिया,दि.११ः महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने (आयटक )च्यावतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते तसेच इतर मागण्यांना घेऊन आज(दि.११)कडकत्या उन्हात जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.त्यानंतर मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्याचे नावे असलेले विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व राज्य महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष मिलिंद गणवीर, जिल्हाध्यक्ष चत्रूघन लांजेवार, कार्यकारी अध्यक्ष महेंद्र कटरे आणि जिल्हा सचिव रवी किटे यांनी केले.जिल्हा परिषद प्रशासनाशी संबंधित २९ मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांना सादर करण्यात आले.मागण्यांमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मिळाल्यापासून एका आठवड्याच्या आत त्याचे वितरण, कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींचे पालन, दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत किमान वेतन, भत्ते आणि भविष्य निर्वाह निधीचा पुरवठा, साप्ताहिक आणि वार्षिक पगारी रजा, अपघात विमा सह शासन निर्णया प्रमाणे पं. स. स्तरावर वर्षात 3 व जि. प. स्तरावर वर्षात 2 तक्रार निवारण समितीच्या सभा घेणे कर्मचाऱ्याच्या सेवा शर्तीचे पालन करने व याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करणे आदीचा समावेश आहे.मिलिंद गणवीर यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात ८ जूनपासून नागपूरमधील मुख्यमंत्री सचिवालय समक्ष होणार असल्याची घोषणा करीत सहभागी होण्याचे आवाहन केले.या आंदोलनात आयटक जिल्हा सचिव रामचंद्र पाटील, महासंघाचे बुधराम बोपचे, ईश्वरदास भंडारी, विष्णू हत्तीमारे, महेंद्र भोयर, भाऊलाल कटंगकर, विनोद शहारे, कु.दिप्ती राणे, देवेंद्र मेश्राम, मनोज जनबंधू, गजेंद्र हिरवाणी, तुलसीदास चौधरी, लोमेश कुमार यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank