24 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home महाराष्ट्र लोकेश चंद्र यांना महा आयकॉन पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते...

लोकेश चंद्र यांना महा आयकॉन पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान

0
101
मुंबई दिनांक 5 जून-मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्र यांचा विजेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‌‘महा आयकॉन 2026‌’ हा जीवनगौरव पुरस्कार देऊन पुढारी‌’ माध्यम समूहातर्फे गौरव करण्यात आला.केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्गमंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत गुरुवारी हा पुरस्कार देण्यात आला.
राज्याचे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत, प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, पुढारी समुहाचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव आणि संपादक योगेश जाधव मंचावर उपस्थित होते.महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत आणि राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी ‌‘पुढारी‌’ माध्यम समूहाने ‌‘महा आयकॉन 2026‌’ या नव्या उपक्रमाचे आयोजन केले होते.

blank