38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय भंडारा-गोंदियात विधान परिषदेत महायुतीत भाजप विरुद्ध अपक्ष(राकाँ अप) लढत

भंडारा-गोंदियात विधान परिषदेत महायुतीत भाजप विरुद्ध अपक्ष(राकाँ अप) लढत

0
1

blank

गोंंदिया,दि.०४ः भंडारा-गोंदिया विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी राजकीय घडामोडी घडत काँग्रेस व काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवारानी आपले अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीतील हवाच निघाली.तुल्यबळ उमेदवार भाजप उमेदवाराच्या सोबतीला नसल्याने मतदारांनाही जी अपेक्षा या निवडणुकीतून होती,त्यावर पाणी फिरल्याचे स्पष्ट झाले आहे.भंडारा-गोंदिया मतदारसंघात आता महायुतीमध्येच थेट लढत होणार आहे.काँग्रेसचे उमेदवार दिलीप बन्सोड आणि अपक्ष उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांनी माघार घेतल्याने चित्र स्पष्ट झाले आहे.भंडारा-गोंदिया मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य असलेले नरेश ईश्वरकर आणि भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर हे रिंगणात आहेत.ब्राम्हणकर सुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेले असून त्यांनी अद्यापही राजीनामा दिलेला नाही.त्यामुळे एकाच पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य हे एकमेकाविरोधात रिंगणात ठाकल्याचे म्हणायला काही हरकत नाही.

NCP च्या नरेश ईश्वरकर विरुद्ध भाजपचे अविनाश ब्राह्मणकर अशी थेट लढत होणार आहे. दोन्ही पक्ष महायुतीत असले तरी जागा सोडण्यास तयार नसल्याने ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे.पुढील गणित काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार माघारी गेल्याने त्यांच्या मतदारांचा कल कोणाकडे वळतो यावर निकाल अवलंबून राहणार आहे.४५७ मतदारांपैकी आधीच महायुतीने आपल्या सर्व मतदारांना नागपूरच्या एका रिसार्टमध्ये थांबवून ठेवले असून आमदार परिणय फुके यांनी सुत्रे हाती घेतले आहेत.विशेष म्हणजे या भाजप महायुतीच्या सदस्यासोबत गोंदिया जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते संदिप भाटिया सुध्दा काँग्रेस सोडून महायुतीच्या गटासोबत पर्यटन यात्रेवर गेल्याने खळबळ माजली आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाटिया यांना १० लाख रुपये व १ कोटीची कामे मंत्रालयातून मिळवून देण्याचे आमिष देण्यात आल्याची चर्चा आहे.भाजपकडून आपल्या मतदारांना २ ते ५ लाख रुपयापर्यतंची रक्कम आगाऊ मतदानाकरीता देण्यात आल्याचीही चर्चा आहे.तर काँग्रेसच्या सदस्यांना ३-४ लाख रुपयाचे आश्वासन देत थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनावर पाठविण्यात आले होते.आता काँग्रेस व अपक्ष प्रफुल अग्रवाल यांनी माघार घेतल्याने काँग्रेस महाविकास आघाडीच्या मतदारासमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे चर्चा सुरु झाली आहे.

blank