28.3 C
Gondiā
Monday, July 6, 2026
Home विदर्भ गोंदियात अमरनाथ यात्रेची नोंदणी सुरू करण्यासाठी आ.अग्रवाल यांचे श्री अमरनाथ श्राइन बोर्डाकडे...

गोंदियात अमरनाथ यात्रेची नोंदणी सुरू करण्यासाठी आ.अग्रवाल यांचे श्री अमरनाथ श्राइन बोर्डाकडे निवेदन

0
12

गोंदिया :गोंदिया व परिसरातील हजारो शिवभक्तांच्या सोयीसाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी एक महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह पुढाकार घेतला आहे. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना नोंदणीसाठी (Registration) अन्य शहरांमध्ये जावे लागू नये, यासाठी आमदार श्री. विनोद अग्रवाल यांनी श्री अमरनाथ श्राइन बोर्डाचे संचालक डॉ. मनदीप के. भंडारी यांना गोंदियातच अमरनाथ यात्रा नोंदणीची सुविधा सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले.
प्रमुख मागण्या :गोंदिया येथे अधिकृत बँक शाखेमार्फत अमरनाथ यात्रा नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात यावी.स्थानिक तसेच ग्रामीण भागातील भाविकांच्या सोयीसाठी विशेष व सुलभ नोंदणी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
या उपक्रमाचे महत्त्व :या सकारात्मक उपक्रमामुळे गोंदिया जिल्ह्यासह परिसरातील हजारो शिवभक्तांना यात्रा नोंदणीसाठी इतर शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे त्यांचा वेळ, खर्च आणि होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल.
शिष्टमंडळाची भेट :हे महत्त्वपूर्ण निवेदन आमदार विनोद अग्रवाल यांचे प्रतिनिधी तथा भाजपा NGO आघाडीचे जिल्हा संयोजक विनोद (गुड्डू) चांदवानी यांनी हरीश भागवानी यांच्या नेतृत्वाखाली श्री अमरनाथ श्राइन बोर्डाचे संचालक डॉ. मनदीप के. भंडारी यांना सादर केले.
यावेळी शिष्टमंडळात मोहित अनदानी, राहुल होतवानी, राहुल मोरयानी, संदीप वेडवानी, मोनू शिवदासानी, मयूर डोडाणी, रितिक वाधवानी, राहुल डोडाणी, सुशील सतानी, आकाश कुकरेजा, करण चंद्राकर, जयेश वाधवानी, अनमोल आहुजा यांच्यासह अनेक शिवभक्त व कार्यकर्ते उपस्थित होते.