बपेरा परिसरात पट्टेदार वाघाचे अस्तित्व

0
15

तुमसर दि. १८ : बपेरा (आंबागड) शिवारात सोमवारी सायंकाळच्या सुमारास पट्टेदार वाघ दिसल्याने एकच खळबळ माजली. शेतशिवारातील महिला यावेळी शेतात होत्या. यामुळे परिसरातील नागरिकात भीती व्याप्त आहे. मंगळवारी शेतकरी महिला पुरुष शेतावर गेले नाही.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास बपेरा (आंबागड) शेतशिवारात पट्टेदार वाघ काही महिला पुरुषांना दिसला. त्यानंतर एकच खळबळ माजली. शेत शिवारातील महिला पुरुष शेतकर्‍यांनी गावाकडे धाव घेतली. मंगळवारी बपेरा व आंबागड शिवारात शेतकरी बांधावर गेले नाही अशी माहिती आहे.
आंबागड परिसरात सातपुडा पर्वतरांगा असून जंगल आहे. जंगलव्याप्त परिसरातून हा पट्टेदार वाघ बपेरा (आंबागड) शिवारात दाखल झाला. आकाराने हा वाघ मोठा असल्याचे सांगण्यात येते. सध्या शेतात धान पिक कापणीचे कामे सुरु आहेत. वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी बांधावर गेले नाही. परंतु काही पडली आहेत. या चिंतेत येथे शेतकरी दिसत आहे. वनविभागाकडे येथे दखल घेण्याची गरज आहे.