26.3 C
Gondiā
Saturday, September 5, 2026
Home गुन्हेवार्ता बिरसी फाटा चौकात भरधाव ट्रक दुकानात घुसला; सुदैवाने जीवितहानी टळली

बिरसी फाटा चौकात भरधाव ट्रक दुकानात घुसला; सुदैवाने जीवितहानी टळली

0
438

चित्रा कापसे/तिरोडा-तालुक्यातील बिरसी फाटा चौक येथे शुक्रवारी दुपारी एक भरधाव ट्रक थेट दुकानात घुसल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 49 सीडी 4737 क्रमांकाचा ट्रक नियंत्रण सुटल्याने फागू राघोरते यांच्या दुकानात घुसला. अपघाताच्या वेळी दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
या घटनेत दुकानातील साहित्याचे नुकसान झाले असून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित घटनेची नोंद पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.