24.3 C
Gondiā
Saturday, July 18, 2026
Home गुन्हेवार्ता तिरोड़ा नगरपरिषद अध्यक्षांसह खासगी व्यक्तीवर एसीबीचा गुन्हा

तिरोड़ा नगरपरिषद अध्यक्षांसह खासगी व्यक्तीवर एसीबीचा गुन्हा

0
26

*२५ लाखांच्या बिलापोटी ३.२० लाखांची लाच मागितली; एसीबीने केला सापळा_

गोंदिया : तिरोड़ा नगर परिषदेचे अध्यक्ष *अशोक रामजीबाबू असाटी* आणि खासगी व्यक्ती *कैलाश किशन वाघमारे* यांच्याविरुद्ध लाच मागितल्याच्या आरोपाखाली एसीबी गोंदियाने गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध तिरोड़ा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

*प्रकरण काय आहे?*
जानकारीनुसार, ६० वर्षीय तक्रारदार यांचा डेकोरेशन व केटरिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी वर्ष २०२५ मध्ये तिरोड़ा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान डेकोरेशन आणि केटरिंगच्या सेवा दिल्या होत्या. निवडणूक संपल्यानंतर त्यांनी २५ लाख २ हजार रुपयांचे बिल नगर परिषदेत सादर केले होते.

तक्रारीनुसार, २० मे २०२६ रोजी बिलाच्या पेमेंटसाठी नगराध्यक्ष अशोक असाटी यांची भेट घेतली असता त्यांनी कथितपणे सांगितले की, “१६ लाख रुपयांपर्यंतचे बिल मंजूर होऊ शकते, परंतु त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनाही पैसे द्यावे लागतील.”

दुसऱ्या दिवशी झालेल्या भेटीत नगराध्यक्षांनी तक्रारदाराच्या हातावर *३ लाख २० हजार* रुपये लिहून तितकी रक्कम देण्याची मागणी केली. तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्यांनी ८ जून २०२६ रोजी एसीबी गोंदिया कार्यालयात तक्रार दाखल केली.

*एसीबीचा सापळा*
तक्रारीच्या आधारे एसीबीने पंचांच्या उपस्थितीत मागणीची पडताळणी केली. तपासादरम्यान नगराध्यक्षांनी ६ लाख रुपयांचा चेक जारी करण्याच्या बदल्यात *१ लाख २० हजार* रुपयांची लाच मागितली आणि ती रक्कम आपल्या पीए *शुभम भोयर* यांना देण्यास सांगितल्याचा आरोप आहे. तसेच उर्वरित १० लाखांचे पेमेंट झाल्यानंतर पुढेही रक्कम मागितली.

त्यानंतर ९ जून २०२६ रोजी एसीबीने सापळा लावला. तक्रारदार रकमेसह आरोपीच्या कार्यालयात पोहोचले, मात्र आरोपींना संशय आल्याने कथितपणे लाचेची रक्कम स्वीकारली गेली नाही. परंतु मागणीची पडताळणी झाल्याने एसीबीने कायदेशीर कारवाई करत १८ जुलै रोजी गुन्हा दाखल केला.

*सध्या काय स्थिती?*
एसीबीने सांगितले की, आरोपींना ताब्यात घेऊन नोटीस देण्यात आली असून त्यांच्या घरांची झडती सुरू आहे. ही कारवाई *पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी* यांच्या नेतृत्वाखाली झाली असून तपास *पोलीस निरीक्षक उमाकांत उगले* करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी गोंदियाच्या टीमने ही कारवाई केली.