24.8 C
Gondiā
Tuesday, July 21, 2026
Home गुन्हेवार्ता आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात; ३ जण गंभीर जखमी

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात; ३ जण गंभीर जखमी

0
66

जालना- जिल्ह्यातील जामखेड परिसरात आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वाहनचालक, अंगरक्षक आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताच्या वेळी आमदार नारायण कुचे वाहनात नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कार जामखेडहून पंढरपूर (Pandharpur) येथे जात होती. प्रवासादरम्यान अचानक रस्त्यावर कुत्रा आल्याने चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याखाली जाऊन पलटी झाली. अपघाताचा जोर इतका प्रचंड होता की वाहनाने अनेक पलट्या घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दुर्घटनेनंतर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला आहे. अपघात पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना वाहनातून बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने जालन्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या अपघातात आमदार नारायण कुचे यांचे अंगरक्षक, वाहनचालक आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. अपघाताची माहिती मिळताच आमदार कुचे यांचे समर्थक आणि स्थानिक पदाधिकारी रुग्णालयात दाखल झाले.

blank