30.9 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home शैक्षणिक शासकीय आश्रम शाळा पुराडाचे शिष्यवृत्ती परीक्षेत दिमाखदार यश!

शासकीय आश्रम शाळा पुराडाचे शिष्यवृत्ती परीक्षेत दिमाखदार यश!

0
9

४ थी चे ९ तर ७ वी चे सर्व ११ विद्यार्थी पात्र; यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

देवरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित इयत्ता ४ थी (प्राथमिक) व इयत्ता ७ वी (उच्च प्राथमिक) शिष्यवृत्ती परीक्षेत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, पुराडा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेत इयत्ता ४ थी चे १० पैकी ९, तर इयत्ता ७ वी चे ११ पैकी ११ विद्यार्थी पात्र ठरले असून शाळेने १०० टक्के गुणवत्तेची अभिमानास्पद नोंद केली आहे. विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण सराव, कठीण परिश्रम, शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि शाळा प्रशासनाच्या प्रभावी नेतृत्वामुळे हे घवघवीत यश शक्य झाले आहे.

या यशामागे शाळेचे प्राचार्य कमल कापसे यांचे प्रेरणादायी नेतृत्व, सर्व शिक्षकवृंदांचे अथक परिश्रम तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

🏆 गुणवंत विद्यार्थ्यांची नामावली

इयत्ता ४ थी (प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा):भोयर लक्की शंकर,कोराम लक्ष्मी मनोज,अचले प्रिया सुरेश,उईके प्रियल शोभेलाल,वालके रोहिणी ओमप्रकाश,कोराम रौनक किसानलाल,भोयर समीर संतोष,भक्ता शुभम राजू,उईके सुशांत विलास

इयत्ता ७ वी (उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा):आर्यन सुनील पांढरे,आर्यन संतोष मडावी,प्रांजली भुवन फापनवाडे,पूर्वेश खेमराज करचाल,रुपाली देवराज वरखडे,समर संजय नेताम,ताजू घनश्याम टेकाम,तुषार चंद्रकुमार सिरसाम,उमंग पुन्नुलाल मडावी,उमेश नरेश कोराम,वैष्णवी पुरणलाल मरासकोल्हे.

💐 सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव

विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राचार्य कमल कापसे, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि मार्गदर्शक प्रकल्प अधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही या आश्रम शाळेतील विद्यार्थी असेच उज्ज्वल यश संपादन करून परिसराचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

शासकीय आश्रम शाळा पुराडा येथील 21 पैकी 20 विद्यार्थी स्कॉलरशीप परीक्षेत पात्र होणे म्हणजे देवरी प्रकल्पासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे, पुराडा शाळेचे नियोजन कौतुकास्पद आहे– नितीन इशोकर प्रकल्प अधिकारी देवरी

blank