28.3 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home शैक्षणिक कोनसरीत ८३ विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके;लॉइड्स मेटल्स व इन्फिनिट फाउंडेशनचा उपक्रम

कोनसरीत ८३ विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके;लॉइड्स मेटल्स व इन्फिनिट फाउंडेशनचा उपक्रम

0
12

चामोर्शी : लॉइड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉइड्स इन्फिनिट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या शालेय साहाय्यता कार्यक्रमांतर्गत जि.प. हायस्कूल कोनसरी येथे २४ जुलै रोजी मोफत शालेय पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत इयत्ता ९ वी, १० वी, ११ वी आणि १२ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण ८३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे, शिक्षणाला बळकटी देणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद हायस्कूल, कोनसरीचे मुख्याध्यापक कोहाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून लॉइड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे प्रशासन विभागप्रमुख बेणुगोपाल यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रमाची गरज याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच लॉइड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

blank