28.3 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ अभा साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्यिकांनी पुढे यावे ः देशमुख

अभा साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्यिकांनी पुढे यावे ः देशमुख

0
9

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे कलावंत आणि साहित्यिक मोठ्या संख्येने आहेत. या गुणी साहित्यिकांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून मनातील भावना आणि विचार लिखित स्वरूपात मांडले पाहिजेत. त्यासाठी ‘अखिल भारतीय साहित्य परिषद’ हे एक सशक्त वैचारिक व्यासपीठ उपलब्ध झाले असून, जिल्ह्यातील साहित्यिकांनी याचा पुरेपूर लाभ घेऊन साहित्य क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल देशमुख यांनी केले.गोंदिया जिल्ह्यात प्रथमच अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या सदस्यांची विशेष सभा पार पडली. या सभेत मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. सभा विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित संचालक अॅड. लखनसिंह कटरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा समन्वयक दुलीचंदराव बुद्धे यांच्च्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत अखिल भारतीय साहित्य परिषद ‘साहित्य-भारती’ गोंदिया जिल्ह्याची नविन कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्षपदी दुलीचंदराव बुद्धे, कार्याध्यक्ष अनूप शुक्ला, उपाध्यक्ष योगेश पारधी व डॉ. इंद्रकला बोपचे, महामंत्री इंजि. सूर्यप्रकाश पारधी, सहमंत्री प्रा. पवन कटरे व लीलाधर पाथोडे, कोषाध्यक्ष व कार्यालय प्रमुख पुरुषोत्तम मेंढे, प्रचार व प्रसार (समाज माध्यम) चांडोराव बिसेन व पवन पाथोडे यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे या नूतन कार्यकारिणीत सदस्य म्हणून दिलीपराव देशमुख, तिलक पटले, सौ. धनिषाताई कटरे, सौ. लताताई बाजपेयी, सौ. भावनाताई कदम, सौ. सुषमा यदुवंशी, सौ. ज्योत्स्नाताई कोरे आणि कु. शिला तिवारी यांचा समावेश करण्यात आला. तसेच मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ साहित्यिक अनिल देशमुख, प्रभाकर वराडे, इंजि गोवर्धन बिसेन आणि प्रा. सुनील भजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सभेचे संचालन लीलाधर पाथोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रचार प्रमुख प्रा. चांडोराव बिसेन यांनी मानले. या नूतन कार्यकारिणीमुळे गोंदिया जिल्ह्यातील साहित्यिक चळवळीला मोठी गती मिळेल, असा विश्वास या वेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

blank