मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये नको!

0
11

मुंबई दि. 21: आरक्षणासाठी मूक मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजामध्ये आरक्षण दिल्यास तीव्र विरोध करू, अशी भूमिका आनंदराज आंबेडकर यांनी घेतली आहे. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात रविवारी झालेल्या जागर कुणबी समाजाच्या कार्यक्रमात आंबेडकर बोलत होते.

आनंदराज आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणास ओबीसी समाजाचा विरोध नाही. मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना इतर ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणाला कुठेही धक्का लावू नये. कारण आधीच ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणात ३६४ जाती आहेत. त्यात मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार १०० हून अधिक जातींची पडताळणी सुरू असून आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची तरतूद करावी. मराठा म्हणजे कुणबी नाहीत. त्यामुळे सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणबींच्या आरक्षणाला हात लावू नये. मराठा समाजातर्फे काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाच्या दबावात सरकारने कोणताही चूकीचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर अविनाश लाड यांनी केले.