संविधान दिन समारंभ शनिवारी

0
7

आमगाव दि.२1: येथील सामाजिक एकता मंचच्यावतीने शनिवारी (दि.२६) सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद््घाटन तहसीलदार साहेबराव राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी प्रबोधनकार अशोक सरस्वती राहतील. मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलक प्रा. हाजी जावेद पाशा कुरेशी, ओबीसी सेवा संघाचे अँड. प्रशांत शेंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार सचिन सांडभोर, यंग मुस्लिम विकास कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद मुस्ताक शेख, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. बी.एम. करमकर, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष बलीराम खोब्रागडे, डॉ. बाबासाहेब समितीचे अध्यक्ष राजभूषण मेश्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचे आर.एन. रावते, लुंबिनी वन पर्यटन समितीचे अध्यक्ष शिवचरण शिंगाडे, ओबीसी संघर्ष कृति समितीचे अध्यक्ष लिलाधर गिरीपुंजे, सल्लागार वाय.सी. भोयर व नरेश बावणे उपस्थित राहणार आहेत.