स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम: जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांची प्रकट मुलाखत
लाखनी:स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्था, लाखनी प्रस्तुत ‘ऑफिसर्स टॉक’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, २० ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. ‘थेट संवाद तरुणाईशी’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी आणि भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांची प्रकट मुलाखत होणार आहे. दिल्लीस्थित पत्रकार प्रशांत वाघाये ही मुलाखत घेणार आहेत.
लाखनी येथील स्वागत सभागृह येथे गुरुवारी (२० ऑगस्ट) सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. स्पर्धा परीक्षा, करिअर, अभ्यासाचे नियोजन, एमपीएससी, यूपीएससी, २१ व्या शतकात आवश्यक कौशल्ये अशा विविध गोष्टींवर या संवादातून चर्चा होणार आहे. याचवेळी विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षकांशी थेट संवाद साधण्याची संधी देखील मिळणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुक विद्यार्थी व युवकांनी नोंदणी करावी, असे आवाहन स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्थेचे सचिव सुधीर काळे, कार्यक्रम संयोजक विशाल हटवार, लिखित पुडके, अंगेश बेहलपांडे, भीष्म लांडगे, नितेश टिचकुले, मीनाक्षी सिंगणजुडे, अनिकेत नगरकर, दुर्गेश टिचकुले, सोहम आगाशे, कोमल वाघाये, आदित्य शाहू यांनी केले आहे. नोंदणीसाठी 8411012404, 9130555225 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.





