24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ जलसंधारण ही काळाची गरज; लोकसहभागातून जलक्रांती घडवा : लायकराम भेंडारकर

जलसंधारण ही काळाची गरज; लोकसहभागातून जलक्रांती घडवा : लायकराम भेंडारकर

0
7

गोंदिया दि.18 : जलसंधारण ही केवळ शासकीय योजना नसून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकचळवळ बनणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घेतल्यास जलसमृद्ध गावांचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इंजोरी येथे आयोजित जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण जनजागृती कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी पंचायत समिती अर्जुनी मोरगावचे उपसभापती संदीप कापगते, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत, गटविकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. भेंडारकर यांनी पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करण्यासाठी जलसंधारण, वृक्षारोपण आणि लोकसहभागाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ घेऊन गावपातळीवर जलसंधारणाची कामे गतीने राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात जलसंधारणाचे महत्त्व विषद करण्यात आले तसेच उपस्थितांना जलसंधारणाची शपथ देण्यात आली.