24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ पुनर्वसित नवीन लाडज गाव भुनकाशावर झळकला

पुनर्वसित नवीन लाडज गाव भुनकाशावर झळकला

0
5

शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी व ॲग्रीस्टॅक नोंदणी करीता येत होत्या अडचणी

देसाईगंज (विष्णू वैरागडे) दि.१८-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात आमगाव ग्रामपंचायत मध्ये पुनर्वसित केलेल्या नवीन लाडज गावाचा आता स्वतंत्र गाव नकाशा तयार करण्यात तालुका भुमी अभिलेख विभागाला यश आले असून आता हे गाव शासनाच्या भुनकाशावर अधिकृतपणे झळकलेला असल्याने आता नवीन लाडज गावाचा नकाशा ऑनलाईन दिसणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील जूनी लाडजमधील पूरग्रस्तांचे १९६१-६२ मध्ये जिल्हा गडचिरोली तालुका देसाईगंज येथील आमगाव ग्रामपंचायत ‌अंतर्गत नवीन लाडज या नावाने पुनर्वसन केले होते.मात्र, या गावाला महसुली दर्जा देण्यात आले नव्हते.३ नोव्हेंबर २०१६ ला नवीन लाडज वाडीचे गावात रूपांतर करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली होती.
या अधिसूचनेची अंमलबजावणी तब्बल ८ वर्ष उलटून देखील केली नसल्याने मागील ९ जानेवारी २०२५ पासून गावकऱ्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने दि.१७ सप्टेंबरला जमावबंदी आयुक्त पुणे यांनी व्हिलेज कोड बहाल केले होते. मात्र या गावाचा स्वतंत्र नकाशा तयार केला नव्हता यामुळे नवीन लाडज अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी व ॲग्रीस्टॅक पासून वंचित होते.
दरम्यान आज दि.१८ ला नवीन लाडज हे गाव शासनाच्या भुनकशावर झळकले असून आता शेतकऱ्यांना ऑनलाईन नकाशा व सातबारा व महसुली पुरावे व खरेदी विक्रीसाठी दरपत्रक घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे प्लॉट रिपोर्ट मिळत असून सर्वे नंबर, धारकाचे नाव खाता क्रमांक व चतु:र्सिमा स्पष्ट दिसणार असल्याचे भुमी अभिलेख विभागाने सांगितले.महाराष्ट्र शासनाच्या महाभूमी वेबसाईटवर नवीन लाडज येण्यासाठी देसाईगंज तालुका भुमी अभिलेख विभागाचे अभिलेखापाल तन्मय टेंडर, छानणी लिपिक राजेश सहारे व निमतांदार मनोज दांडवे यांनी अथक परिश्रम घेतले.

“शासनाच्या महाभुनकशाच्या वेबसाइटवर नवीन लाडज गाव आलेला आहे, हा गाव भुनकाशावर येण्यासाठी तालुका भुमी अभिलेख विभागाच्या टीमने अथक परिश्रम घेतले असून पुण्याच्या जमावबंदी आयुक्त यांच्याकडून मान्यता मिळविण्यासाठी जिल्हा अधीक्षक श्री विजय भालेराव गडचिरोली यांचे मार्फत प्सरस्तावपाठविण्यात आले होते, त्याला अधिकृत मान्यता दिली आहे”
~श्री मुकेश सेलोकर उप अधीक्षक तालूका भुमी अभिलेख देसाईगंज वडसा.