23.9 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home विदर्भ पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या रांगोळी व पोस्टर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या रांगोळी व पोस्टर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
4

जलसंधारण सप्ताहानिमित्त कार्यक्रम
गोंदिया, दि.19 : लघु पाटबंधारे जिल्हा परिषद उपविभाग, आमगाव कार्यालयाच्या वतीने 15 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत साजरा होत असलेल्या जलसंधारण सप्ताहानिमित्त सडक अर्जुनी येथील जिल्हा परिषद शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन, पाणी बचत व पर्यावरण संरक्षण या विषयांवर आकर्षक कलाकृती सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती चेतन वडगाये, पंचायत समिती सदस्य शालिंदर कापगते तसेच अल्लाउद्दीन राजानी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एन.के. गजभिये, डी. पी. डोंगरवार, एन.आर. गिरेपुंजे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
लघु पाटबंधारे जिल्हा परिषद उपविभाग, आमगावच्या वतीने उपअभियंता शुभदा असटूल, शाखा अभियंता प्रिती नागपुरे, कनिष्ठ अभियंता अनिल आदमने, टेकराम बिसेन व रोहित नागलवाडे यांनी कार्यक्रमात सहभाग घेत विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे महत्त्व समजावून सांगितले.
या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याचा उद्देश सफल झाला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत “पाणी वाचवा, भविष्य वाचवा” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.