27.4 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home विदर्भ नवेगावबांध येथे उद्या ‘पुस्तकांच्या गाव’चे लोकार्पण;जि.प.सदस्यांना मिळाले पत्रिकेत स्थान

नवेगावबांध येथे उद्या ‘पुस्तकांच्या गाव’चे लोकार्पण;जि.प.सदस्यांना मिळाले पत्रिकेत स्थान

0
2

बेरार टाईम्सच्या वृत्ताची दखल,पत्रिकेत जि.प.सदस्यांचे नाव

गोंदिया,दि.२० (विशेष प्रतिनिधी): वाचन संस्कृतीचा प्रसार आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथे साकारण्यात आलेल्या ‘पुस्तकांच्या गावा’चा भव्य लोकार्पण सोहळा उद्या, शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात पार पडणार आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असून, पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक खासदार व आमदारांची उपस्थिती लाभणार आहे. मात्र, या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेवरून सध्या स्थानिक राजकीय वर्तुळात नवा वाद उफाळून आलेला होता.या पत्रिकेत नवेगावबांध जिल्हा परिषद क्षेत्राबाहेरील अर्जुनी नगर पंचायतच्या नगराध्यक्षांना मानाचे स्थान देण्यात आले होते.मात्र ज्या जिल्हा परिषद क्षेत्रात सदर कार्यक्रम त्याच क्षेत्राच्या जि.प.सदस्यांना डावलल्याचे वृत्त बेरार टाईम्सने प्रकाशित करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.या प्रकाशित वृत्तानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आणि आयोजक प्रशासनाला सुधारित पत्रिका तयार करीत जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांना पत्रिकेत मानाचे स्थान देण्यात आले.