गोंदिया,-केंद्र व राज्य सरकारच्या जन विरोधी, किसान कामगार विरोधी, विद्यार्थी -युवक विरोधी, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, महिला विरोधी धोरणाच्या विरोधात “बदलाव जरुरी हैं “1 सप्टेंबर चलो दिल्ली च्या घोषणा देत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI ) गोंदिया तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी विविध गांवी जनजागरण केले CPI चे जिल्हा सचिव कॉ. मिलिंद गणवीर, तालुका सचिव कॉ. प्रल्हाद उके, जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ. करुणा गणवीर व जिल्हा कौन्सिल सदस्य कॉ. जितेंद्र गजभिये यांच्या नेतृत्वात अर्जुनी, आंभोरा, खातीया, मोगर्रा, सिरपूर, रजेंगांव, मुरपार, रावणवाडी, दासगाव खुर्द, दासगाव बुज. सह इतर ग्रामीण भागात या मोहिमेत चौक सभा, जाहीर पत्रकाचे वाटप करण्यात आले.वाढती माहांगाई, शेतकरी, कामगार कष्टकरी जनतेचे गंभीर प्रश्न, पेपरफुटीच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थीनीं वर अमानुष अत्याचार लाठीहल्ला गोळीबार, शिक्षणाचे बाजारीकरण, सरकारी शाळा बंद करने, आरोग्य व्यवस्थेचे गंभीर प्रश्न, युवकांची बेरोजगारी, कामगार विरोध 4 श्रम कोड आदी सर्व प्रश्नांवर अपयशी संघप्रणित संविधान विरोधी मोदी सरकार चा निषेध करत “बदलाव जरुरी हैं “साठी 1 सप्टेंबर चलो दिल्ली चे आव्हान CPI कार्यकर्त्यांनी जनतेला केले. या संपूर्ण मोहिमेत कॉ.राजेंद्र गजभिये, कॉ. क्रांती गणवीर, राजकुमार साऊसकार, शिवकुमार सुलाखे, शहारे, गुड्डू खोटेले, हंसराज खांडेकर, सुंदर बाई तावाडे, मेश्रामबाई, दलित डोंगरे, भय्यालाल डोंगरे, प्रकाश डहाट, आमनाबी शय्यद, सचिन डहाट, अनिता वासनिक, छोटू लांजेवार, अनिल गजभिये पुरुषोत्तम मेश्राम, जातींद्र जगणे, प्रकाश चौरे, क्षीरसागर सह इतर कार्यकर्त्यानीं मोहीम यशस्वी केली.





