25.8 C
Gondiā
Sunday, September 6, 2026
Home राजकीय आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा ८ रोजी

आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा ८ रोजी

0
8

शेतकरी, युवा आणि महागाईच्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी

तिरोडा :शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, धानाला बोनस, बेरोजगारी, वाढती महागाई आणि सर्वसामान्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) च्या वतीने ८ सप्टेंबर रोजी तिरोडा येथे ‘जन आक्रोश मोर्चा’ चे आयोजन करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख नेतृत्वात हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक चांगलाच संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना २४ तास वीज
पुरवठा मिळावा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची प्रोत्साहन राशी तात्काळ वितरीत करावी आणि अण्ए ई-पीक पाहणीची नोंद जुन्याच पद्धतीने करण्यात यावी, धान उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भावासोबत बोनस देणे व सरसकट कर्जमाफी करण्याची ठाम मागणी या वेळी केली जाणार आहे. तसेच वाढत्या महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा देणे, लादण्यात येणारे स्मार्ट मीटर रद्द करणे, ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना वेळेवर देणे, संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील बीपीएलची अट रद्द करणे, पेपर फुटी रोखून बेरोजगारांच्या हाताला काम देणे आणि
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मार्गी लावणे, या प्रमुख मुद्द्यांवर सरकारविरुद्ध आवाज उठवला जाणार आहे.या मोर्चात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, डॉ. खुशाल बोपचे, सुनील भुसारा, चरण वाघमारे आणि सलील देशमुख यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते व प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा जन आक्रोश मोर्चा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे गोंदिया जिल्हाध्यक्ष रविकांत खुशाल बोपचे व पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकरी, तरुण, महिला आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.