गोंदिया, दि.10 : अग्रणी जिल्हा बँक प्रायोजित बँक ऑफ इंडिया स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे सोमवारी बँक ऑफ इंडियाच्या 121 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सतर्कता जागरूकता दिनाचा (Vigillence Awareness Day) कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमामध्ये सायबर क्राईम विभागातर्फे श्री. संजय, इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने डॉ. मौसमी तिवारी, डॉ.निखिल नागपुरे, डॉ.गगन टेंभरे, डॉ.शिवानी हरिणखेडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांचे स्वागत करून संस्थेचे निदेशक अब्दुल वसीम यांच्या प्रस्तावनेतून करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित मान्यवर तसेच संस्थेतील कर्मचारी व प्रशिक्षणार्थीने सत्यनिष्ठतेची शपथ घेतली. त्यानंतर सायबर क्राईम विभागाचे अधिकारी श्री. संजय यांनी आरसेटी गोंदिया येथे सुरु असलेल्या असिस्टंट बुककीपिंग, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन व सर्व्हिसिंग तसेच मशरुम लागवड या प्रशिक्षणामधील प्रशिक्षणार्थ्यांना सतर्कता म्हणजे काय? या विषयावर सखोल मार्गदर्शन करून मोबाईलच्या माध्यमातून होणाऱ्या नागरिकांच्या फसवणूक, फेसबुक इंस्टाग्राम व व्हाट्स ॲपचा कशाप्रकारे सुरक्षितरित्या वापर करून आपले अकाउंट टू फॅक्टर ऑथेंटिकेशनने सुरक्षित ठेवता येते तसेच मोबाईलच्या माध्यमातून युपीआय पेमेंट व एटीएमचा सुरक्षित वापर कसा करावा याविषयी सखोल माहिती दिली.
सोबतच ऑनलाईन माध्यमातून फसवणूक झाल्यास 1930 या क्रमांकावर संपर्क करावे किंवा http://cybercrime.gov.in या वेबसाईटवर आपली तक्रार नोंदवावी. इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे डॉ. मौसमी तिवारी यांनी कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करून आरसेटी गोंदियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुला-मुलींमध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व व व्यावसायिक कौशल्य विकसित करण्याचे जे कार्य सुरु आहे त्याची प्रशंसा केली. डॉ.निखिल नागपुरे यांनी मौखिक आरोग्य व दातांची काळजी कशी घ्यावी यावर सविस्तर मार्गदर्शन करून प्रत्येक व्यक्तीने आपले कौशल्य ओळखून त्यामध्ये वाढ करून जीवनामध्ये यश मिळविता येते अशी माहिती दिली.