अर्जुनी मोर.– तालुक्यातील रामपुरी, खांबी व शिरेगाव बांध प्रादेशिक पाणीपुरवठा योजना थकीत वीज बिलामुळे १ सप्टेंबरपासून बंद झाल्याने परिसरातील नागरिकांसमोर निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी संबंधित गावांच्या सरपंचांनी आज ता.15 रोजी अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार बडोले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
या योजनांवर परिसरातील अनेक गावे व हजारो कुटुंबे अवलंबून असून, पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे थकीत वीज बिलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून या योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी सरपंचांनी निवेदनातून केली.
निवेदन स्वीकारताना आमदार राजकुमार बडोले यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच गुरुवारपर्यंत रामपुरी, खांबी व शिरेगाव बांध प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या नाहीत, तर शुक्रवारी सर्व संबंधित सरपंचांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी योजनांचे थकीत वीज बिल व इतर देणी तातडीने भागविण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, योजनांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कायमस्वरूपी आर्थिक व्यवस्था करणे तसेच भविष्यात आर्थिक कारणांमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नयेत यासाठी शासनस्तरावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अत्यंत गंभीर असून, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून योजना सुरू कराव्यात, अशी मागणी संबंधित गावांच्या सरपंचांनी केली आहे.
या शिष्टमंडळात सौ दिपाली कापगते सरपंच देवलगाव, सौ पंचशीला भोजराज मेश्राम सरपंच सुकळी, नीलकंठ आसाराम बोरकर उपसरपंच भिवखिडकी, मोरेश्वर सोनवणे उपसरपंच चान्ना, बाक्टी सौ अश्विनी लोणारे सरपंच खांबी, सौ कुरुंदा इंद्रजीत वैद्य सरपंच बोरटोला,सौ सरिता राजगिरे बाक्टी , सौ सागरबाई दिलीप चिमणकर सरपंच सिरेगाव, सौ भूमिका प्रमोद ढोक सरपंच सोमलपुर, भूषण नेवारे सरपंच मुंगली, प्रदीप कांबळे सरपंच अरततोंडी राज्यपाल गभने उपसरपंच दाभना, काशीनाथ कापसे उपसरपंच बोरटोला,पतिराम मेश्राम (सरपंच) प्रशासक कवठा, सचिन डोंगरे सरपंच चान्ना ,विवेक डोंगरे सरपंच गुढरी, हेमकृष्ण संग्रामे उपसरपंच शिरेगाव किशोर तरोणे माजी जि प सदस्य नवेगावबांध, हेमराज पुस्तोडे सदस्य पंचायत समिती अर्जुनी मोर, टीकाराम कापगते माजी उपसरपंच परसोडी रयत, राजू फुंडे सामाजिक कार्यकर्ता ब्राह्मणटोला, संकर औरासे, विलास हिरामण राऊत, गिरीधर बोरकर सोमलपुर संदीप येरणे बोरटोला, मेळे उपसरपंच सुकळी ,हरीराम नंदनवार डोंगरगाव ,सुभाष मेश्राम बाक्टी, संकर मेश्राम मुंगली , कालिदास पुस्तोडे सदस्य देवलगाव, चंद्रभान टेंभुर्णे सदस्य परसोडी रयत,प्रामुख्याने उपस्थित होते.





