24.7 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home Top News कोळसा खाणीत जमीन खचली, 50 मजदूर अडकल्याची भीती

कोळसा खाणीत जमीन खचली, 50 मजदूर अडकल्याची भीती

0
45

रांची,(वृत्तसंस्था) दि. 30 – झारखंडमध्ये कोळसा खाणीतील जमीन खचली असून 40 ते 50 कामगार आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही खाण ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडची आहे. गोड्डा जिल्ह्यातील ललमाटिया परिसरात असणा-या भोडाय गावात ही दुर्घटना घडली आहे. काही मशिन्सदेखील अडकल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरफ) टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे. दुर्घटना झाली तेव्हा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) एक तुकडी घटनास्थळी होती, मात्र त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नसून सर्व सुरक्षित आहेत.