24.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home Top News नक्षल्यांनी केली तिघांची हत्या

नक्षल्यांनी केली तिघांची हत्या

0
41

गडचिरोली,दि. ३०: जिल्ह्यात राज्यपाल, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री येण्याच्या पूर्व रात्री काल नक्षल्यांनी तीन जणांची पोलीस खब-या असल्याच्या संशयावरून हत्या केली. लटा मडावी (३५) रा. रूमालकसा व पदाडी आत्राम (३६) रा. गुर्जा, ता. अहेरी व तलवारसाय कुंजाम रा़ अलोंडी ता़ कोरची अशी मृतकांची नावे आहेत.
काल रात्री १० वाजताच्या सुमारास सशस्त्र नक्षलवादी लटा मडावी व पदाडी आत्राम यांच्या गावी गेले. दोघांना गावाबाहेर नेऊन त्यांची हत्या केली. दोघेही एसपीओ म्हणून काम करत होते. अशी माहिती आहे. तसेच कोरची तालुक्यातील अलोंडी येथील तलवारसाय कुंजाम याचीही नक्षल्यांनी ११ वाजताच्या सुमारास हत्या केली़ आठवडाभरापूर्वीच नक्षल्यांनी सुरजागड येथील लोहखनिज प्रकल्पाच्या कामांवरील ८० वाहने जाळली होती. त्यानंतर दोघांची हत्या केल्याने दक्षिण गडचिरोलीत नक्षल्यांची दहशत वाढल्याचे दिसून येत आहे.