24.7 C
Gondiā
Saturday, July 18, 2026
Home महाराष्ट्र विनायक मेटेंना शिवस्मारक समितीवरुन हटवा

विनायक मेटेंना शिवस्मारक समितीवरुन हटवा

0
18

मुंबई,दि.10 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची मराठा समाजाच्या संघटनेच्या प्रतिनिधींनीची भेट घेतली असून मराठा समाजाच्या संघटनांनी या बैठकीत शिवस्मारक समितीचे पुनर्गठन करण्याची मागणी केली.

मराठा समाजाने शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यावर आक्षेप घेतला असून टीम झाली पण त्यांनी काम केले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यात मराठा संघटनांना सामील करुन घेतले नसल्याचे सांगतानाच मेटेंची कार्यपद्धत मान्य नसल्याचेही मराठा समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींतर्फे सांगण्यात आले.

या बैठकीला एकूण ४३ मराठा समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. छावा संघटना, मराठा आरक्षण समन्वय समिती, ताराराणी ब्रिगेड प्रदेश, शंभूराजे युवा क्रांती संघटना, शेतकरी मराठा सेवा संघ यासारख्या संघटनांचा समावेश होता. शिवस्मारक भूमीपूजनच्या वेळी विनायक मेटे यांनी नाराजी नाट्य केले होते. मात्र अडीच वर्षात एकही बैठक झाली नाही, मराठा समाज संघटनेला विचारात घेतले नाही, असा दावा बैठकीत करण्यात आला.