31.3 C
Gondiā
Thursday, July 16, 2026
Home क्रीडा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी भाजपचे आशिष शेलार

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी भाजपचे आशिष शेलार

0
29

मुंबई- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी भाजपचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांची निवड करण्यात आली आहे. लोढा समितीच्या अहवालानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्याचप्रमाणे माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांनीही एमसीएच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

गुरुवारी झालेल्या एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आशीष शेलार यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली. शरद पवारही बैठकीला उपस्थित होते. जस्टिस लोढा समितीच्या शिफारशीनुसार एमसीएच्या आगामी निवडणुका घेणे, तसेच एमसीएचा कारभार चालवणे, असे आव्हाने आशीष शेलार यांच्यासमोर राहाणार आहेत.