
गोंदिया,दि.९-गोंदिया शिक्षण संस्थेचे संस्थापक गोंदिया भंडारा जिल्ह्याचे स्वनामधन्य नेते स्व.मनोहरभाई पटेल यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या पुर्णाकृती प्रतिमेला माल्यार्पण करुन बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्यासह इतर मान्यवरांनी आदराजंली वाहिली.यावेळी त्यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल पटेल, जनता दल (युनायटेड)चे राष्ट्रीय प्रवक्ता माजी खासदार के.सी.त्यागी, माजी खा.पवन वर्मा,उद्योगपती शशी रुईया,भारतीय फुटबॉल टीमचे माजी कर्णधार बाईचुंग भुटीया,माजी मंत्री अनिल देशमुख,आमदार गोपालदास अग्रवाल,माजी आमदार दिलीप बनसोड,नाना पंचबुध्दे,अनिल बावनकर,बंडु सावरंबांधे,रामरतन राऊत,मधुकर कुकडे,विजय शिवणकर,नरेश माहेश्वरी,गोंदिया शिक्षण संस्था व मनोहरभाई पटेल अकादमी अध्यक्षा वर्षा पटेल,गुजरातचे धिरु राजा,भगीरथ पटेल,अजय वडेरा आदी मान्यवर उपस्थित होते.नितिशकुमार यांनी याप्रसंगी सैनिक शाळेला भेट देऊन पाहणी केली.तसेच मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुध्दा पाहणी केली.