27.7 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home राजकीय खोटे बोलण्याचे नोबेल आमच्या भावाला मिळेल- पंकजा मुंडे

खोटे बोलण्याचे नोबेल आमच्या भावाला मिळेल- पंकजा मुंडे

0
22

उदगीर, दि. 9 – भावामुळे मी वैतागून गेले आहे, आमचे बंधू इतके खोटे बोलायला लागले आहेत की खोटे बोलण्याचे नोबेल त्यांना मिळेल, अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा नामोल्लेख टाळून गुरुवारी उदगीरमध्ये केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उदगीर व जळकोट तालुक्यांतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांनी उदगीर व जळकोट येथे सभा घेतल्या. यात त्यांनी त्यांचे बंधू विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. त्या म्हणाल्या, माझ्यावर कितीही टीका केली तरी बोलले नाही. परंतु आता माझ्या लोकांनी मौन बाळगू नका, उत्तर द्या़, अशी शपथ घातली. म्हणून मी बोलतेय, आमचे बंधू म्हणतात, गोपीनाथ मुंडेंनी त्यांना बाहेर काढले. आम्हाला जायचे नव्हते. त्याच्या दोनच दिवसांनी अजित पवार म्हणतात, धनंजयने दीड वर्ष आमच्याकडे चकरा मारल्या. शेवटी दुसऱ्या पक्षात जातो म्हटल्यावर आम्ही घेतले. मग आता खोटं कोण बोलतंय, हे त्यांनी जाहीर करावे.