24.5 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home राष्ट्रीय देश दिल्लीत पोहोचताच मुख्यमंत्री थेट मोदींच्या घरी

दिल्लीत पोहोचताच मुख्यमंत्री थेट मोदींच्या घरी

0
20

नवी दिल्ली,दि. 28: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोघांमधे चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाल्याबरोबर पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेले.
मुख्यमंत्री आज पर्यावरण विभागाच्या बैठकांच्या निमित्ताने दिल्लीत आहेत. मात्र या बैठकीच्या निमित्ताने मुंबईतील महापौरपदाबाबतची चर्चा होणार आहे.भाजपच्या मदतीशिवाय अन्य कुणाचंही सहकार्य घेऊन मुंबई महापालिकेचं महापौरपद मिळवायचं, असा निर्धार शिवसेनेनं केल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील कोंडी कायम आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.याठिकाणी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांचीही भेट घेणार असल्याचं समजते.भाजपच्या मदतीशिवाय अन्य कोणाचेही सहकार्य घेऊन महापौरपद मिळवायचे, हा शिवसेनेचा निर्धार असून उभयपक्षी कोंडी पुढील काही दिवस तरी कायमच राहणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांची भेट महत्त्वाची मानली जाते.दरम्यान, मुख्यमंत्री कोस्टल रोडसंदर्भात पर्यावरण मंत्री अनील दवेंसोबत बैठक घेणार आहेत. याशिवाय राज्यातील साखर प्रश्नाबाबत ते केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेणार आहेत.