26.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ महापौर उपमहापौरची ५ मार्चला निवड

महापौर उपमहापौरची ५ मार्चला निवड

0
34

नागपूर दि. 28 : महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज बुधवारी १ मार्चला दुपारी ३ पर्यंत सिव्हिल लाईन येथील महापालिकेच्या स्थायी समितीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात स्वीकारले जाणार आहेत. यासोबतच महापौर कोण होणार, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.५ मार्चला विशेष सभेत महापौर व उपमहापौर यांची निवड केली जाणार आहे. तत्पूर्वी अर्जाची छाननी व अर्ज मागे घेण्यात येणार आहे. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. महापालिकेतील संख्याबळ विचारात घेता मतदानाची गरज भासणार नसल्याचे चित्र आहे.महापालिकेच्या सभागृहातील सदस्य संख्येच्या आधारावर स्थायी समितीत प्रतिनिधित्व दिले जाते. १६ सदस्यीय स्थायी समितीत संख्याबळाचा विचार करता भाजपचे १२ तर काँग्रेसच्या तीन सदस्यांना संधी मिळणार आहे. बसपाच्या एका सदस्याला संधी मिळणार आहे. सभागृहातील सदस्यसंख्या विचारात घेता शिवसेना व राष्ट्रवादीला स्थायी समितीवर संधी मिळण्याची शक्यता नाही.