25 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home शैक्षणिक परशुराम विद्यालय मोहगाव बु येथे निरोप समारंभ

परशुराम विद्यालय मोहगाव बु येथे निरोप समारंभ

0
37

गोरेगाव,दि.01: परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथे इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्याकडून निरोप समारंभ करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून के.टी. पटले (माजी तं.मु.अध्यक्ष),हूमराज बावनकर(सेवा सह.अध्यक्ष मोहगाव बु.)हे होते. कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापकानी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शैक्षणिक परीक्षेसोबतच सामाजिक परीक्षेत सुद्धा पास होणे गरजेचे आहे असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन इयत्ता ९वी विद्यार्थीनी कु.हिमानी पटले व श्री.डी.डी.चौरागडे यांनी केले तर आभार श्री.बी.सी.गजभिये यांनी मानले.कार्यक्रमासाठी सर्वश्री.पी.एम.चुटे,टी.एफ.ईलपाचे, व्ही.एस.मेश्राम, कु.भारती बिसेन,एल.वाय.पटले,एल.आय. बोपचे,पी.व्ही.पारधी,के.बी.पारधी,डी. एम.बोपचे यांनी सहकार्य केले.