41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय लातूरच्या महापौरपदी भाजपाचे सुरेश पवार

लातूरच्या महापौरपदी भाजपाचे सुरेश पवार

0
28

blank

लातूर, दि. 22 –  लातूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच झेंडा फडकविलेल्या भाजपाने महापौरपदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून पक्षात आलेल्या सुरेश पवार यांना बसवून काँग्रेसह भाजपाच्या निष्ठावंतानाही धक्का दिला. तर उपमहापौरपदी देविदास काळे या भाजपा निष्ठावंतांला संधी दिली. या निवडणुकीत भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना ३६ तर काँग्रेस उमेदवारांना स्वत:ची ३३ व राष्टÑवादीचे एक असे  प्रत्येकी ३४ मते मिळाली. काँग्रेसचे महापौरपदाचे विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौरपदाचे उमेदवार युनूस मोमीन यांना दोन-दोन मताने पराभूत व्हावे लागले. अनुभवी सुरेश पवार यांच्या निवडीमुळे महापालिकेचा गाडा चालवायला अनुभवी चेहरा मिळाला आहे.
सभागृहात एकमेव सदस्य असलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिल्याने  बलाबल ३४ मते मिळाली. लातूर महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची एकहाती सत्ता होती़ पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ७० पैकी सर्वाधिक ३६ जागांवर भाजपाने विजय मिळविला. तर सत्तेत असेलल्या काँग्रेसला ३३ व राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी झाली.

blank