
यवतमाळ,दि.22- जिल्ह्यातील महागाव तालुक्यात येत असलेल्या महातोली येथील शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. सध्या या परिसरात शेतशिवारातील गोठ्याला आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली असल्याने आगीमागील कारण शोधणे महत्वाचे झाले आहे. सुनील गोविंद हागे यांच्या मंगल शिवारातील शेतीत असलेल्या गोठ्याला आग लागून अंदाजे ७ लाखांचे नुकसान झाले. त्यातच दुसऱ्या एका घटनेत महागाव शहरालगत असलेल्या मनोहर किसन गावंडे यांच्या शेतात एकास एक लागून असलेल्या एका गोठ्याला आग लागून लाखोंचे नुकसान झाले.





