
भोपाळ, दि. 8 – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी मंदसौर येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. राहुल गांधी पोलिसांना चकवा देत बाईकवरुन जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.राहुल गांधींना पोलिसांनी नीमच जवळील जीरण येथे ताब्यात घेतले आहे. पोलिस त्यांना खोर येथील विक्रम सिमेंट फॅक्टरीच्या विश्रामगृहात घेवून गेले आहेत. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, मी फक्त शेतकऱ्यांची भेट घेऊ इच्छित होतो.
पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या मंदसोर येथील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आले होते. मात्र, पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले. राहुल गांधी पोलिसांना चकवा देत बाईकवरुन जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी राहुल गांधी यांनी सरकारला लक्ष्य केले.राहुल गांधी म्हणाले, की पोलिसांनी मला अटक करताना कोणतेही कारण दिलेले नाही. अशाच प्रकारे मला उत्तर प्रदेश येथे जातानाही रोखण्यात आले होते. मोदी सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करते. मात्र, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकत नाही. मला शेतकऱ्यांना भेटायचे होते. पण, कोणतेही कारण न देता अटक करण्यात आली. तुमचे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी न जुळाल्यास तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये प्रवेश मिळणार नाही.





