23.3 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home महाराष्ट्र ज्येष्ठ समाजसेविका मेहरुनिसा हमीद दलवाई यांचं निधन

ज्येष्ठ समाजसेविका मेहरुनिसा हमीद दलवाई यांचं निधन

0
30
पुणे, दि. 8 – मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेहरुनिसा हमीद दलवाई यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या.  आज सकाळी 11. 30 वाजण्याच्या सुमारास मेहरुनिसा यांनी अखेरचा श्वास घेतला.मेहरूनिसा यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम पाहिले. हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च सेंटरच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या.  “मी भरून पावले” हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.