42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Featured News नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

0
21

blank

गडचिरोली,दि.08 : स्थानिक नगर परिषदेच्या नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या ८ जुलै रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या सकाळी ९ वाजता वीर बाबुराव शेडमाके नगर परिषद प्राथमिक शाळा विसापूर येथे वृक्षारोपण, सकाळी १0 वाजता नगर परिषदेच्या बगिचामध्ये वृक्षारोपण, सकाळी ११ वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांना फळवाटप, दुपारी १२ वाजता एकता निवासी मुकबधिर विद्यालय मुरखळा येथे साहित्य वाटप, दुपारी २ वाजता भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विर्शामगृहात नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या सत्कार सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक व नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

blank