चिमूर,दि.११: चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाला असताना महिलांचे संसार सुखी राहावे यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यानी जिल्हा दारूबंदी केला असला तरी चिमूरसह तालुक्यात महिला दारूचा धंदा राजरोसपणे करीत असून दारू पिणार्यांची वाट लावून त्या गब्बर बनल्या आहेत, अशातच भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असंलेल्या लोहारा गावात अवैध दारूविक्री फोफावली असताना महिला एकजूट होऊन दारूबंदीसाठी सरसावल्या आहेत र्त्यांनी आ. कीर्तिकुमार भांगडीया व ठाणेदार दिनेश लबडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
नेरीतूनच दारूसाठा जात असल्याची माहिती महिलांनी दिली. नेरी पोलिस चौकी प्रभारी प्रमुख यांनी दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. परिसरात दारूबंदी करणारी महिला आणि दारू विकणारी महिला असे समीकरण आढळत आहे. लोहारा येथील दारूबंदी करण्यासाठी महिला सरसावल्या असून आ. कीर्तिकुमार भांगडीया यांनी दारूबंदीचे आश्वासन देऊन महिलांना बॅटरी भेट म्हणून दिल्या. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. श्यामजी हटवादे ,तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, डॉ. देवनाथ गंधारे, विनोद अढाल, एकनाथ थुटे, प्रकाश वाकडे, कलीम शेख, ओमप्रकाश गणोरकर, आदी पदाधिकारी व लोहारा गावकरी उपस्थित होते.





