39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home महाराष्ट्र पञकार संरक्षण समिती बिलोलीची कार्यकारणी जाहीर

पञकार संरक्षण समिती बिलोलीची कार्यकारणी जाहीर

0
19

नांदेड/बिलोली,दि.23- येथिल शासकीय विश्रामगृह येथे पञकार संरक्षण समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.अध्यक्षपदी ए.जी.कुरेशी त,सचिवपदी सय्यद रियाज तर कार्याध्यक्षपदी संजयकुमार बिलोलीकर यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.पञकारावरील सततचे होत असलेले हल्ले व अन्याय अत्याचार या वर वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रभर  पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पञे हे कार्य करीत असुन बिलोली येथे  जिल्हा अध्यक्ष  हुकूमचंद जैन व जिल्हा सचिव शेख शब्बीर यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली तालूका कार्यकारणी आज(दि.23)जाहीर करण्यात आली.त्यात तालूका उपाध्यक्षपदी प्रकाश फुगारे,सहसचिव-राजाराम गुरगुलवार,कोषाध्यक्ष-इलीयास फारुखी,प्रसिद्धी प्रमुख सुनिल जेठे,संघटक- अनिल मोरे,बालाजी हमंद,गणपत धर्मपुरे,तर सदस्यामध्ये दिगांबर लाडे,बालाजी कुरनापल्ले यांचा समावेश आहे. यावेळी प्रा.मारोती भदरगे, सय्यद युसुफ देगलूरकर आदी उपस्थित होते.