डाॅ.विजय वानखेंडेचा आरोग्य विभागाच्यावतीने सत्कार

0
10

गोंदिया,दि.22- जागतिक लोकसंख्या दिनानिम्मित आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यात सर्वात जास्त कुटूंब कल्यण शस्रक्रिया केल्याबद्दल तसेच गोंदिया जिल्ह्याने राज्यात पुरुष नसबंदि शस्त्रक्रीयेत दुसरा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉं.श्याम निमगडे व शस्त्रक्रीया करणारे वैद्यकिय अधिकारी डाॅ.विजय वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला.जि.प.सभागृहात आयोजित कार्यक्रमात जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, उपाध्यक्ष रचनाताई गहाने व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला.सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे  डॉ.विजय वानखेडे यांनी सन २०१६ -१७ या वर्षात जिल्ह्यात सर्वात जास्त कु. क.शस्त्र.८९२ पुरुष व ३२१४स्त्री एकुन ४१०६ शस्त्र.केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.