37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Top News काश्मिरात दहशतवाद्यांच्या हल्यात अकोल्याचा जवान शहिद

काश्मिरात दहशतवाद्यांच्या हल्यात अकोल्याचा जवान शहिद

0
21

blank

श्रीनगर, दि. 13 – जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये कालपासून सुरू असलेल्या चकमकीत महाराष्ट्रातील जवान सुमेध वामन गवई यांना वीरमरण आले आहे. गवई हे अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचे सुपुत्र होते. या चकमकीमध्ये गवई यांच्यासह अन्य एका जवानाला वीरमरण आले आहे. तर तीन जवान जखमी झाले आहेत. या चकमकीदरम्यान लष्कराने एका दहशतवाद्यालाही ठार मारले आहे.

blank