श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार जाहिर

0
19

वर्मा, गजभिये, भदाडे, अग्रवाल, शेडे, मेश्राम, मोटघरे, सपाटे ठरले मानकरी
गोंदिया,दि.13:- श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १५ आॅगस्ट रोजी टिळक गौरव पुरस्काराचे वितरण तसेच जिल्ह्यातील १० वी व १२ वी च्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध गटातील स्पर्धेसाठी प्रवेशिका आमंत्रित करण्यात आल्या होत्या. पुरस्कार निवड समितीच्या वतीने या प्रवेशिकांची छाननी करून या वर्षीच्या श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार जाहिर केले आहेत. यावर्षीच्या टिळक गौरव पुरस्कारासाठी वरिष्ठ पत्रकार सुब्रत पाल यांची निवड सर्वानुमते करण्यात आली असून स्व. मनोहरभाई पटेल स्मृती संपादकीय पुरस्कारासाठी आशिष वर्मा, स्व. पंडित शंकरलाल शर्मा वृत्तवाहिनी पुरस्कारासाठी प्रथम पुुरस्कार हरिश मोटघरे तर व्दितीय पुरस्कार ओमप्रकाश सपाटे, स्वातंत्र्य सैनिक स्व. हिरालाल जैन स्मृती उत्कृष्ठ विकास वार्ता पुरस्कारासाठी प्रथम पुरस्कार महेंद्र गजभिये तर व्दितीय पुरस्कार गणेश भदाडे, स्व. संतोष अग्रवाल स्मृती शोध वार्ता पुरस्कारासाठी प्रथम पुरस्कार रितेश अग्रवाल व व्दितीय पुरस्कार यशवंत शेंडे तर उत्कृष्ठ छायाचित्रासाठी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्कारासाठी अर्जुनी/मोरगावचे डॉ. शरद मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे.IMG-20170711-WA0046
त्याच प्रमाणे १२ वीच्या परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातून प्रथम आलेली आमगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी वैष्णवी अशोक शेंडे व १० वीच्या परीक्षरेत जिल्ह्यातून प्रथम आलेला सौंदड येथील के.आर. जे. लोहिया विद्यालयाचा विद्याथीग् ओंकार केशव चोपकर यांचा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. सर्व विजेत्यांना १५ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता राईस मिलर्स असोच्या सभागृहात जिल्हाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्षा उषाताई मेंढे, राज्यसभा सदस्य प्रफुलभाई पटेल, खासदार नाना पटोले, खा. अशोक नेते, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, माजी आमदार राजेंद्र जैन, गोंदिया नगराध्यक्ष अशोकराव इंगळे, उपाध्यक्ष शिव शर्मा, माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जि.प.च्या उपाध्यक्षा रचनाताई गहाणे, सभापती पि.जी. कटरे, छायाताई दसरे, विमलताई नागपूरे, देवराम वडगाये, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, राईस मिलर्स असोचे अध्यक्ष अशोक अग्रवाल व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. एच.एच. पारधी उपस्थित राहणार आहेत.