41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home महाराष्ट्र क्रांतिवीर संगोळी ‘रायन्ना’ने ब्रिटीशांची झोप उडवली : आबासो पुकळे

क्रांतिवीर संगोळी ‘रायन्ना’ने ब्रिटीशांची झोप उडवली : आबासो पुकळे

0
47

blank

सांगली (प्रतिनिधी) : शहरातील शिंदे मळ्यात क्रांतिवीर संगोळी रायन्ना जयंतीचे आयोजन सांगली शहर रासपच्यावतीने करण्यात आले. प्रमुख मान्यवरांचे हस्ते संगोळी रायन्नांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. क्रांतिवीर संगोळी रायन्नांची भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील माहीती युवा लेखक व पत्रकार आबासो पुकळे यांनी दिली.भारतीय स्वातंत्र्यासाठी क्रांतीवीर संगोळी रायन्नाने ब्रिटीशांची सर्वप्रथम झोप उडवली असल्याचे प्रतिपादन आबासो पुकळे यांनी केले.यावेळी रासपचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ टेंगले, शहराध्यक्ष महेशदादा मासाळ, प्रमोद सरगर, आकाश बांगर, बयाजी धायगुडे व संगोळी रायन्नाप्रेमी व देशभक्त उपस्थित होते.

blank